|| श्री गजानन महाराज ||
गजानन नाम... ज्याच्या मुखातुन...
चित्ती समाधान.... लाभतसे....
गजानन नाम .... || धृ. ||
शेगावी प्रगट्ला.. उद्धारण्या जगा
प्रेमरुप झाला... भक्तांसाठी...
मनोभावे, मुखी घ्यावे.. गणी गणात बोतें..
गजानन नाम .... || १ ||
काया-वाचा-मने... चित्त एक झाले
जीव-शिव तत्व ... एकरुप झाले ..
नामा संग, झालो दंग.. अंत पार झाला..
गजानन नाम ... || २||
चरणी ठाव द्या हो.. जीव कासावीस
मुक्तिधाम दावा.. हीच एक आस
तुम्हां वीण , आता कोण ?.. स्वामी मज आसरा..
गजानन नाम .... || ३ ||